नाशिकमध्ये गुरुवारी (दि. २१ ऑक्टोबर) इतके होते किमान तापमान

नाशिकमध्ये गुरुवारी (दि. २१ ऑक्टोबर) इतके होते किमान तापमान

नाशिक (प्रतिनिधी): पावसाने उघडीप दिल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील किमान तापमानात घसरण होत असल्याने वातावरणात गारवा जाणवू लागला आहे.

गुरुवारी किमान तपमानात घसरण झाली असून १६.१ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली.

यंदा परतीच्या पाऊस दमदार झाल्याने ऑक्टोबर हिटचा तडाखा हा केवळ दोन ते तीन दिवस जाणवला. मात्र, दोन ते तीन दिवसांपासून किमान तपमानात घसरण होत असल्याने थंडीसोबत धुकेही जाणवायला लागले आहे. नाशिक शहरातील हवामान केंद्रात गुरुवारी १६.१ अंश सेल्सियसची नोंद करण्यात आली. बुधवारी किमान तापमान हे १५.९ अंश सेल्सिअस होते. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने आदिवासी भागातील आंबा आणि काजू पिकांसाठी उपयोगी ठरणार आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
बिबट्याच्या हल्ल्यात सहा वर्षीय मुलगा जखमी.. मुलाची आई धावून येताच बिबट्याने ठोकली धूम..
नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत इतके रुग्ण घेत आहेत कोरोनावर उपचार; तालुकानिहाय आकडेवारी

Loading

हे ही वाचा:  Breaking: जुने नाशिकमध्ये जाळपोळ करणाऱ्या पाच जणांना अटक !

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group