नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): वातावरणाच्या खालच्या थरातील द्रोणिका रेषा विदर्भ ते कर्नाटकपर्यंत आहे. त्यामुळे राज्यात जळगाव, अहमदनगर आणि पुणे येथे हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून नाशिकसह कोकणात चार दिवस वातावरण कोरडे रहाणार असल्याने उन्हाचा कडाका राहणार आहे. सोमवारी सोलापूर येथे उच्चांकी ४४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
७ मे रोजी नांदेड व लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. १० मेपर्यंत राज्यात बहुतांश जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
राज्यात निवडक शहरांत सोमवारचे कमाल तापमान: नाशिक ३६.८, मालेगाव ४२.६, पुणे ३८.६, अहमदनगर ४२.०, जळगाव ४२.२, कोल्हापूर ३९.३, महाबळेश्वर ३१.८, सांगली ४१.१, सातारा ४०.०, सोलापूर ४४.१, धाराशिव ४२.७, छत्रपती संभाजीनगर ४१.२, परभणी ४२.६, नांदेड ४२.६, बीड ४३.२, अकोला ४३.७, अमरावती ४३.२, बुलडाणा ३९.५, ब्रम्हपुरी ४४.१, चंद्रपूर ४३.६, गोंदिया ४१.४, नागपूर ४३.५, वाशिम ४३.४, वर्धा ४३.५, यवतमाळ ४२.०