नाशिक शहरात बुधवारी “या” भागात पाणीपुरवठा नाही !

नाशिक (प्रतिनिधी) : पंचवटी विभागाअंतर्गत दुर्गानगर, मखमलाबाद, रामकृष्ण नगर मखमलाबाद हे तीन जलकुंभ भरणारी उर्ध्ववाहिनी पेठरोड,  मेरी कार्यशाळेजवळ गळती झाल्याने सदर पाईप लाईन दुरुस्तीचे काम बुधवार (दि.२४) रोजी दुरुस्ती करण्यात येणार असल्याने खालील परिसरात बुधवार (दि.२४) दुपारचा आणि संध्याकाळचा पाणी पुरवठा होणार नाही. तसेच गुरुवार (दि.२५) रोजी सकाळी पाणी पुरवठा कमी दाबाने होईल.

हे ही वाचा:  नाशिक जिल्ह्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत झाले 'इतके' टक्के मतदान…

प्रभाग क्र.०१ मधील श्रीधर कॉलनी, ओंकार नगर, शिवतेज नगर, एस. टी. वर्कशॉप.

प्रभाग क्र.०६  मधील मेहेरधाम, यशोधानगर, कल्याणी सोसायटी तसेच मखमलाबाद व रामकृष्ण नगर, शांतीनगर, एरिगेशन कॉलनी, तांबे मळा, घाडगे नगर, गोकुळ नगर, स्वामी विवेकानंद नगर, साहारा नगर.

हे ही वाचा:  नाशिक: एसटी व ट्रकचा अपघात; दोन्ही चालक ठार; २ जण गंभीर जखमी

प्रभाग क्र.०६  मधील मखमलाबाद गांव, चांदशी रोड, मोतोरी रोड, मखमलाबाद रोउ पश्चिम भाग, मातोश्री नगर, विद्या नगर, वडजाई माता नगर, महादेव कॉलनी., गंगावाडी रोड, फाडोळ मळा, कोळी वाडा, रामकृष्ण नगर, तांबे बोराडे नगर, पिंगळे नगर, मानकर नगर, महालक्ष्मी नगर, जयमल्हार कॉलनी, स्वामी विवेकानंद नगर, मानकर मळा, तवली डोंगर परिसर.

हे ही वाचा:  नाशिक: खाजगी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक जण जखमी

प्रभाग क्र.०४   मधील कर्णनगर, समर्थनगर, तुळजा भवानी नगर हमालवाडी, अनुसयानगर, पवार मळा, अध्वमेघ नगर व लगतच्या परिसरात.

याबाबत परिसरातील नागरिकांनी नोंद घेऊन महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन नाशिक महानगरपालिकेने केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790