नाशिककरांनो, ‘या’ दिवशी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद

नाशिक (प्रतिनिधी): नाशिककरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे. संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा येत्या शनिवार बंद राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे नाशिककरांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: डा‍क विभागाची 2 फेब्रुवारीला पेन्शन अदालत; निवृत्तीवेतनधारकांनी 28 जानेवारीपर्यंत करावेत अर्ज

मनपाचे मुकणे रॉ वॉटर पंपींग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील सबस्टेशन मधील दुरुस्ती कामे करणे व ३३ केव्ही क्षमतेच्या उपकरणांची तपासणी करणे तसेच गंगापूर धरण रॉ वॉटर पंपींग स्टेशन येथील मीटरींग क्युबिकलचे नवीन आवश्यक दुरुस्ती कामे तातडीने करणे आवश्यक असल्याने महावितरण कंपनीकडील वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  राज्यात दोन दिवस ढगाळ वातावरण; काही भागांत हलक्या पावसाची शक्यता

शनिवार दि. १६/०९/२०२३ रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० वा. बंद ठेवावा लागणार असल्याने दि. १६/०९/२०२३ रोजी संपूर्ण नाशिक शहरातील पाणी पुरवठा होणार नाही.

तसेच दि. १७/०९/२०२३ रोजी सकाळचा पाणी पुरवठा कमी प्रमाणात कमी दाबाने होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे असे आवाहन अधीक्षक अभियंता (या.) नाशिक महानगरपालिका नाशिक यांच्या मार्फत करण्यात येत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790