नाशिक (प्रतिनिधी): मुकणे धरणावरील पालिकेच्या पंपिंग स्टेशनचा वीजपुरवठा दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार असल्यामुळे शनिवारी (दि. २८) सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान मुकणे धरण थेट पाइपलाइनद्वारे सिडको, पाथर्डी, इंदिरानगर, वडाळारोड तसेच नाशिक पूर्व विभागातील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
रविवारीही कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. शनिवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ दरम्यान महावितरणच्या शटडाउनमुळे मनपाचे मुकणे डॅम रॉ. वॉटर पंपिंग स्टेशन येथून विल्होळी जलशुद्धीकरण केंद्राला होणारा रॉ वॉटरचा पुरवठा या कालावधीत बंद राहणार आहे. त्यामुळे सिडकोतील काही भाग व नाशिक पूर्व विभागातील काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
⚡ हा भाग होणार प्रभावित:
👉 नविन नाशिक: प्र.क्र. 22, प्र.क्र. 24, प्र.क्र. 25, प्र.क्र. 26, प्र.क्र. 27, प्र.क्र. 28, प्र.क्र. 29, प्र.क्र. 31
👉 नाशिकरोड: प्रभाग क्र. 22 मधील वडनेर गेट, पंपीग पर्यंत, व रेंज रोड परिसरात पाणीपुरवठा होणार नाही.
👉 नाशिक पूर्व विभाग: प्रभाग क्र. 14, प्र.क्र. 23, प्र.क्र. 30