रविवारच्या (दि. २० जून) लसीकरणाबाबत नाशिक महानगरपालिकेने महत्वाची माहिती दिली आहे.
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महानगरपालिकेतर्फे उद्याच्या लसीकरणाबाबत महत्वाची माहिती दिली आहे. यात म्हंटले आहे की, नागरिकांना सूचित करण्यात येते की उद्या दिनांक : २०-०६-२०२१ रोजी सर्व लसीकरण केंद्रावर लसीकरण बंद राहणार असून कोणीही लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, याची नाशिककर नागरिकांनी नोंद घ्यावी. सोमवारच्या लसीकरणाबाबत लवकरच माहिती देण्यात येईल, असे महापालिकेने दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे. नाशिक शहरात सोमवारपासून पुढील आदेश येईपर्यंत सायंकाळी चार वाजेपर्यंत मॉल्स खुले असणार आहेत. मात्र मॉल्समधील कर्मचारी आणि ग्राहकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. नाशिक कॉलिंग आवाहन करत आहे की फक्त मॉल्सच नाही तर इतर ठिकाणी फिरतांना सुद्धा शासनाच्या नियमांचे पालन करा. जेणेकरून आपल्याला संभाव्य तिसरी लाट रोखता येईल..!