नाशिककरांनो रविवारच्या (दि. 11 जुलै) लसीकरणाबाबत महत्वाची बातमी..!

नाशिककरांनो रविवारच्या (दि. 11 जुलै) लसीकरणाबाबत महत्वाची बातमी..!

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहराच्या लसीकरणाबाबत नाशिक महानगरपालिकेने महत्वाची माहिती दिली आहे. नाशिक महानगरपालिका,नाशिक सार्वजनिक आरोग्य विभाग रविवार दि :११ जुलै २०२१  रोजी मनपा हद्दीतील लसीकरण बंद राहणार आहे. नागरिकांना सूचित करण्यात येते की उद्या दिनांक : ११ जुलै २०२१  रोजी सर्व लसीकरण केंद्रावर लसीकरण बंद राहणार असून कोणीही लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, याची नाशिककर नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. भारतातील काही भागात कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरीइंट आढळून आला आहे. त्यामुळे नाशिक कॉलिंग आवाहन करत आहे की शहरात कुठेही फिरतांना कोरोनाबाबत शासनाने ठरवून दिलेल्या प्राथमिक नियमांचे पालन करा. त्याचप्रमाणे डेंग्यूचा प्रसारही मोठ्या प्रमाणात नाशिक शहरात होत आहे. त्या दृष्टीनेही काळजी घेणे गरजेचे आहे.

Loading

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790