नाशिक (प्रतिनिधी): जिल्हयात कोरोना रूग्णसंख्या वाढत असतांना त्यात नव्या स्ट्रेनने आणखी भर घातल्याने नाशिककरांची चिंता वाढवली. मात्र रात्री उशिरा जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झालेल्या खुलाश्यानूसार नाशकात नवा स्ट्रेन नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला आहे.

नाशिकमध्ये वाढत्या कोरोना संसर्गास नवा स्ट्रेन असल्याचे समोर आले. हा नवा स्ट्रेन युरोप, दुबईतून आल्याचे पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेने (एनआयव्ही) स्पष्ट केले आहे. नाशिकच्या आरोग्य यंत्रणेकडून एनआयव्हीकडे पाठविण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये हा नवा स्ट्रेन आढळला असल्याची पुष्टी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली होती. मात्र याबाबत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले की, आम्हाला एनआयव्हीकडून जीनोम सिक्वेन्सिंगचा अहवाल प्राप्त झाला होता.

त्यामध्ये ब्रिटन, दुबई, कॅनडा, सौदी अरेबिया बेस, डेन्मार्क, ऑस्ट्रेलिया इत्यादी भागांचा संबंध असल्याचे संकेत दिले गेले. म्हणूनच पुढील कार्यवाहीबाबत आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांकडून मार्गदर्शन मागवले होते. त्यानूसार व्हीओसी व्हीयूआय (तपासणी अंतर्गत चलनाचे व्हेरिएंट) दिसून येत नाहीत. कोणत्याही नमुन्यात यूके दक्षिण आफ्रिकन किंवा ब्राझिलियन स्त्रेन नाही. बदलांच्या ज्या विशिष्ट क्रमात जेनोम् असणे आवश्यक आहे, ते या नमुन्यात नाही त्यामुळे नाशिककरांनी चिंता करण्याचे कारण नाही मात्र काळजी घेणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी सूजर मांढरे यांनी सांगितले