वॉर्ड बॉयनेच केली पीपीई कीट घालून रेमेडिसीवरची चोरी

जयेश साबळे, महाराष्ट्र एक्सप्रेस ग्रुप, नाशिक
नाशिकमध्ये रेमेडिसीवर इंजेक्शनच चोरी केल्याची घटना समोर आला आहे, श्री गुरुजी रुगणालयातून OT मदतनीस आणि वॉर्ड बॉय यांनीच रेमेडिसीवर इंजेक्शन चोरल्याचा प्रकार पोलिस तपासात समोर आला आहे…

नाशिकमध्ये हॉस्पिटलमधून रेमेडिसीवरच चोरून नेल्याचा प्रकार समोर आला होता. गंगापूररोड येथील श्री गुरुजी रुग्णालय येथे कोविड रुग्णांवर उपचार होतात. या ठिकाणी उपचार घेत असलेल्या एका रुग्णाला रेमेडिसीविरचा पहिला डोस देण्यासाठी काउंटरवर बॉक्समध्ये हे रेमेडिसीविर ठेवण्यात आले होते. मात्र ते नंतर चोरीला गेले.

याबाबत पोलिसांकडे तक्रार केली असता पोलिसांनी या हॉस्पिटलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात पीपी ई कीट घालून आलेल्या दोघांनी हे रेमेडिसीवर चोरून नेल्याचा प्रकार cctv मध्ये कैद झाला. त्यामुळे हॉस्पिटलच्या स्टाफवरच सगळ्यात आधी संशय निर्माण झाला. पोलिसांनी cctv फुटेज च्या आधारे प्रकरणाचा शोध घेत प्रकरणाचा छडा लावत रुग्णालयातीलच OT मदतनीस सागर सुनील मुटेकर आणि वॉर्ड बॉय गणेश गंगाधर बत्तीसे यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 10, 800 रुपयांचे चोरी केलेले रेमेडिसीवर जप्त केले आहे.

नाशिकमध्ये आता रेमेडिसीवरच्या काळाबाजार करण्याच्या घटनापाठोपाठ ,रेमेडिसीवर चोरी केल्याच्या घटना देखील समोर येऊ लागल्याने आता रुगणांचे नातेवाईक ,रुगणालय प्रशासन यांना रेमेडिसीवर बाबत सतर्क राहावे लागणार आहे हे मात्र नक्की.. ! सदर प्रकरणाबाबत गंगापूर पोलिस अधिक तपास करत आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790