नाशिक: देखावे बघण्यासाठी गर्दीच्या शक्यतेने ‘या’ भागातील वाहतूक मार्गात बदल !

नाशिक (प्रतिनिधी): पंचवटीतील मालेगाव स्टॅन्ड, पंचवटी कारंजा भागासह लगतच्या परिसरातील देखावे बघण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी होत असल्याने दि. १४ ते १७ सायंकाळी ५ ते रात्री १२ या कालावधीत मालेगाव स्टैंड, पंचवटी कारंजा, मखमलाबादनाका या मार्गावरील वाहतूकीस प्रवेश बंद राहणार आहे.

या मार्गावर प्रवेश बंद दिंडोरीनाक्याकडून मालेगाव स्टँड, मखमलाबादनाका ते मालेगाव स्टॅन्ड, या मार्गावरील वाहतुकीस प्रवेश बंद राहणारी, वरील मार्गावरील वाहतूक दिंडोरी नाक्याकडून मालेगाव स्टॅन्डकडे जाणारी वाहतूक पेठनाका, रामवाडी, चोपडा लॉन्समार्गे इतरत्र जाईल.

हे ही वाचा:  धक्कादायक: नाशिकला एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

मखमलाबाद नाक्याकडून मालेगाव स्टॅन्डकडे जाणारी वाहतूक पेठनाकामार्गे इतरत्र जाईल अथवा गर्दीची ठिकाणे सोडून इतर पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

तुम्ही नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन केला आहे का ?

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790