नाशिक (प्रतिनिधी): विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पूर्व, मध्य, पश्चिम, आणि इगतपुरी-त्र्यंबक मतदारसंघांसाठीची मतमोजणी शहरातील चार केंद्रांच्या ठिकाणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेने मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी वाहतूक मार्गात बदल केले आहेत. वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी याबाबत अधिसूचना जारी केली आहे.
बुधवारी (ता.२०) तर, मतमोजणी शनिवारी (ता.२३) होणार आहे. तर, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शहरातील कन्या शासकीय विद्यालयात होणार आहे.
या पार्श्वभूमीवर शहरात निवडणूक कामकाजानिमित्त मोठ्या प्रमाणात एसटी बस, शासकीय वाहने यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. तर, मंगळवारी (ता.१९) विधानसभा मतदारसंघातील केंद्रांवर मतदान साहित्यासह इव्हीएम मशिनचे वाटप केले जाणार आहे. यासाठी सकाळी ७ ते सायंकाळी ७ तसेच, बुधवारी (ता.२०) मतदानानंतर सायंकाळी ४ ते मतदान साहित्य जमा होईपर्यंत शहरातील ठिकठिकाणच्या वाहतूक मार्गात बदल केले आहेत. तसेच, शनिवारी (ता.२३) सकाळी ६ ते मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वाहतूक मार्गात नियोजन केले आहे. वाहनचालकांनी याकाळात पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन उपायुक्त खांडवी यांनी केले आहे.
⚡ मतदारसंघानिहाय वाहतूक मार्गातील बदल:
⚡ नाशिक पूर्व १२३ विधानसभा मतदारसंघ (मतमोजणी केंद्र : मीनाताई ठाकरे स्टेडिअम, हिरावाडी)
प्रवेश बंद मार्ग:
👉 स्वामिनारायण चौक, मीनाताई ठाकरे स्टेडिअम ते के.के.वाघ कॉलेज.
👉 कमलनगर चौक ते मीनाताई ठाकरे स्टेडिअमकडे दोन्ही बाजूकडील मार्ग
पर्यायी मार्ग:
👉 सर्व्हिस रोडकरिता उड्डाणपुलाखालील हायवे
👉 कमलनगरकडील वाहतूक ही कमलनगर, हिरावाडी, काट्या मारुती चौक मार्गे इतरत्र
⚡नाशिक मध्य १२४ विधानसभा मतदार संघ(मतमोजणी केंद्र : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, भाभानगर)
प्रवेश बंद मार्ग:
👉 दादासाहेब गायकवाड नगर ते हिरवे नगर, नासर्डी नदीलगतचा मार्ग
पर्यायी मार्ग:
👉 मुंबई नाका, नवशक्ती चौक, नागझी सिग्नल मार्गे इतरत्र
⚡नाशिक पश्चिम १२५ विधानसभा मतदार संघ(मतमोजणी केंद्र : छत्रपती संभाजी स्टेडिअम, सिडको)
प्रवेश बंद मार्ग (शनिवार, ता २३ रोजी पहाटे ४ ते मध्यरात्रीपर्यंत वाहतुकीला प्रवेश बंद):
👉 महाले पेट्रोल पंप ते सिंहस्थनगर दुहेरी मार्गावरील वाहतुकीला बंद
👉 स्टेट बँक चौक ते रतनसिंह बाबूसिंग परदेशी चौक (सेंट लॉरेन्स शाळा चौक) दुहेरी मार्गावरील वाहतुकीला बंद
पर्यायी मार्ग:
👉 सिंहस्थनगरकडून महाले पेट्रोल पंपाकडे जाण्यासाठी महिंद्रा गेस्ट हाऊससमोरून अश्विननगरमार्गे पाथर्डी फाटा व इतरत्र
👉 महाले पेट्रोलपंपाकडून सिंहस्थनगरकडे जाण्यासाठी गुन्हे शाखा युनिट दोन समोरून अश्विननगर मार्गे इतरत्र
👉 परदेशी चौक (सेंट लॉरेन्स शाळा)कडून पाथर्डी फाट्याकडे जाण्यासाठी सहावी स्कीम, सिडको हॉस्पिटलमार्गे पाथर्डी फाटा व इतरत्र
⚡इगतपुरी-त्र्यंबक विधानसभा मतदार संघ(मतमोजणी केंद्र : शासकीय कन्या विद्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, नाशिक)
प्रवेश बंद मार्ग (शनिवार, २३ तारखेला सकाळी ६ ते मध्यरात्रीपर्यंत)
👉 सीबीएस सिग्नल ते मेहेर सिग्नल या दोन्ही मार्गांवरील वाहतूक बंद
पर्यायी मार्ग:
👉 अशोकस्तंभाकडून सीबीएसकडे जाणारी वाहतूक अशोकस्तंभ, मेहेर सिग्नल, सांगली बँक, शालिमार मार्गे
👉 मोडक सिग्नलकडून सीबीएसकडे जाणारी वाहतूक मोडक सिग्नल, किटकॅट कॉर्नर चौक, खडकाळी सिग्नल, शालिमार,सांगली बँक सिग्नलमार्गे
👉 सांगली बँक सिग्नलकडून मेहेर सिग्नल मार्गे सीबीएसकडे जाणारी वाहतूक सांगली बँक सिग्नल, शालिमार मार्गे इतरत.