नाशिक (प्रतिनिधी): द्वारका परिसरातील उड्डाणपुलाखालील रस्ता ते जत्रा हॉटेल, मुंबईनाका उड्डाणपुलाखाली काँक्रिटीकरणाचे काम सध्या सुरू आहे. यापैकी मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे.
हे ही वाचा: शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद; सुट्टीचे औचित्य साधून आज साईट व्हिजिटचे अनेकांचे नियोजन !
आता दुसऱ्या बाजूच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू होत असल्याने १६ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबरपर्यंत या भागातील वाहतूक वाळविण्यात आली आहे. मात्र पहिल्याच दिवशी इंदिरानगर बोगद्याजवळ वाहतूक कोंडी झाल्याने वाहनचालक त्रस्त झाले होते.
🛑 ९ नोव्हेंबरपर्यंत असा आहे वाहतूक मार्गात बदल:
👉 इंदिरानगर बोगद्याकडून मुंबईनाक्याकडे जाणारी वाहतूक ही गोविंदनगर बाजूकडील सर्व्हिसरोडने जाईल.
👉 मुंबई नाक्याकडून गोविंदनगरकडे जाणारी वाहतूक ही इंदिरानगर बाजूकडील सर्व्हिसरोडने जॉगिंग ट्रॅक बोगदामार्गे वळेल.
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790