महत्वाची बातमी: नाशिक: सीबीएस-मेहेर सिग्नल वाहतूक ‘हे’ दोन दिवस बंद

नाशिक (प्रतिनिधी): सोमवार (दि.२८ऑक्टोबर २०२४) व मंगळवार (दि. २९ ऑक्टोबर २०२४) असे दोन दिवस विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांची संख्या जास्त असेल. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज भरणाऱ्या उमेदवारांसह त्यांच्या सोबतचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची गर्दीही असेल.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चोरीच्या पाच मोटारसायकलींसह आरोपी अटकेत; पाच गुन्हे उघडकीस

त्यामुळे हे दोन दिवस मेहेर सिग्नल ते सीबीएस सिग्नल या दरम्यान दोन्ही बाजूच्या मार्गावर वाहतूक बंद असेल. सर्व प्रकारच्या वाहनांना या रस्त्यावर सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत बंदी असेल.

मोडक सिग्नलकडून सीबीएसकडे जाणारी वाहने मोडक सिग्नल शालीमार- सांगली बँक सिग्नल मार्गे जातील. अशोक स्तंभाकडून सीबीएसकडे जाणारी वाहने अशोकस्तंभ, मेहेर सिग्नल, सांगली बँक सिग्नल मार्गे जातील. सांगली बँक सिग्नलकडून मेहेर सिग्नल मार्गे सीबीएसकडे जाणारी वाहने सांगली बँक सिग्नल, शालीमार मार्गे इतरत्र जातील.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790