नाशिक (प्रतिनिधी): दसऱ्याला अर्थात शनिवारी (दि. १२) रामकुंड, यशवंत महाराज पटांगणावर रावण दहन होणार असल्याने दुपारनंतर दुपारी ४ ते रात्री ९ या वेळेत या परिसरात जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. रामकुंड येथे रावण दहन व राम-लक्ष्मण सेनेची मिरवणूक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रवेश बंद : मालेगाव स्टैंड, सरदार चौक, ते गाडगे महाराज पूल तसेच गाडगे महाराज पुलाकडून सरदार चौक, रामकुंड ते मालेगाव स्टँडकडे जाणाऱ्या व येणाऱ्या सर्वप्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग : या मार्गावरील वाहतूक गणेशवाडी, काट्या मारुची पोलिस चौकी, निमाणी बसस्थानक, पंचवटी कारंजा येथून इतरत्र जातील.
![]()
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790


