नाशिक: शहरातील ‘या’ वाहतूक मार्गांत रविवारी (दि. २९) महत्वाचे बदल…

नाशिक। दि. २८ मार्च २०२६: श्रीराम रथ, गरुड रथ मिरवणूक २९ मार्च रोजी काढण्यात येईल. या मार्गावरील वाहतुकीस प्रवेश बंद असून पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन पोलिसांनी केले.

मिरवणूक मार्ग-श्री राम रथ: काळाराम मंदिर पूर्व दरवाजा, नागचौक, चरण पादुका चौक, लक्ष्मण झुला, काट्या मारुती चौकी, गणेशवाडीरोड, महात्मा फुले पुतळा, मरीमाता रोडने गौरी पटांगण, कपालेश्वर मंदिर, रामकुंड, परशुरामपुरीया रोडने मालवीय चौक, शनीचौक, हनुमान चौक, आखाडा तालीम, काळाराम मंदिर, उत्तर दरवाजा

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा; अफवांना बळी पडू नका - जिल्हाधिकारी

गरुड रथ: गौरी पटांगण रोकडोबा हनुमान मंदिर, गाडगे महाराज पुलाखालून दिल्ली दरवाजा, नेहरु चौक, धुमाळ पॉइंट, मेनरोडने बोहरपट्टी, सराफ बाजार, रामसेतूच्या पश्चिम बाजूने कपुरथळा मैदान, म्हसोबा पटांगण, रामरथासोबत येऊन काळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथे विसर्जन.

प्रवेश बंद: सीता गुंफा, मालेगाव स्टँड, ढिकले वाचन कक्ष ते रामकुंड, दिल्ली गेट ते म्हसोबा पटांगण, आयुर्वेद रुग्णालय.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790