नाशिक शहरात मंगळवारी  (दि. १३) वाहतूक मार्गात महत्वाचे बदल !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी गेल्या आठवडाभरापासून राज्यभरात सुरू केलेल्या शांतता रॅलीचा मंगळवारी (दि. १३) नाशिकमध्ये ७ किलोमीटरची रॅली काढून समारोप होणार आहे. राज्यभरातून सुमारे ५ लाख मराठा समाजबांधवांच्या उपस्थितीचा आयोजकांनी दावा केला असून या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणेने जादा बंदोबस्तासह रॅली मार्ग निश्चित केला असून त्यातील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवून पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात येणार आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिककरांनो लक्ष द्या ! शहरातील 'या' वाहतूक मार्गांत अतिशय महत्वाचे बदल !

हे मार्ग आहेत बंद:
स्वामीनारायण चौकापासून ते कन्नमवार पूल, मिर्ची हॉटेल ते स्वामीनारायण चौक, संतोष टी पॉईंट ते दिंडोरी नाका मार्गे मालेगाव स्टॅण्ड, तसेच रविवार कारंजाहून सांगली बँक सिग्नल, मेहेर सिग्नल ते सी. बी. एस. या मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांना दोन्ही बाजूंनी सकाळी 8 वाजेपासून ते मोर्चा संपेपर्यंत प्रवेश बंदी राहील.

हे आहेत पर्यायी मार्ग:
छत्रपती संभाजीनगरकडून येणारी वाहने मिर्ची हॉटेल सिग्नलपासून अमृतधाम-तारवालानगर चौक-कृषी उत्पन्न बाजार समिती सिग्नल-पेठ रोड मार्गे जातील. धुळ्याकडून येणारी वाहने अमृतधाम मार्गे तारवालानगर चौक, बाजार समिती सिग्नल, पेठ रोड मार्गे शहरात येतील.  दिंडोरी नाक्याकडून शहरात येणारी वाहतूक ही पेठ नाका, मखमलाबाद नाका, रामवाडी पूल या मार्गे जाईल. तर दिंडोरी नाक्यावरून बाहेर जाणारी वाहने दिंडोरी नाका-तारवालानगर चौक-हिरावाडी मार्गे बाहेर पडतील. द्वारका सर्कलकडून कन्नमवार पुलाखालून जाणारी वाहतूक ही द्वारका उड्डाणपुलावरून पुढे जाईल.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: जालना येथील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला नाशिकमध्ये अटक

विविध ठिकाणी पार्किंगची सोय:
छत्रपती संभाजीनगरकडून येणारी वाहने निलगिरी बाग, तपोवन येथे थांबतील. पेठ रोड व दिंडोरी रोडकडून येणारी वाहने आर. टी. ओ. जवळ शरद पवार मार्केट यार्ड, पेठ रोड येथे थांबतील. घोटी, इगतपुरी व मुंबईकडून येणारी वाहने महामार्ग बस स्थानकाशेजारील मोकळ्या जागेत पार्क होतील. त्र्यंबक रोडकडून येणारी वाहने गोल्फ क्लब मैदानावर थांबतील. गंगापूर गावाकडून येणारी वाहने डोंगरे वसतिगृह मैदान व मविप्र कॉलेजमध्ये पार्क होतील.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here