नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहर व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना मनपा प्रशासनाच्या वतीने केल्या जात आहेत. विविध प्रकारच्या आस्थापना सुरू ठेवण्याबाबत असलेल्या शासन निर्देशाचे पालन न केल्याने व रात्री ८ वाजे नंतर आस्थापना सुरू ठेवल्याने द्वारका परिसरातील ३ ट्रॅव्हल्स सील करण्यात आले आहेत.
शासनाने ठरवून दिलेल्या कालावधी पेक्षा जास्त कालावधी आस्थापना सुरू ठेवून नियमांचे पालन न केल्याबद्दल सोमवारी रात्री द्वारका परिसरातील सुलक्ष्मी ट्रॅव्हल्स, शताब्दी ट्रॅव्हल्स आणि एके ट्रॅव्हल्स या अस्थापना सुरू असल्याने परिसराचे नोडल अधिकारी उपायुक्त प्रदीप चौधरी यांनी विभागीय अधिकारी स्वप्नील मुदलवाडकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांच्या पथकाने या तीन ट्रॅव्हल्सवर कारवाई करीत हे ट्रॅव्हल्स सील करण्याची कार्यवाही केलेली आहे.