नाशिक (प्रतिनिधी): बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील सुमारे ५ लाख २३ हजारांचा सोने-चांदीचे दागिने आणि रक्कम असा ऐवज चोरी करण्यात आला आहे. नाशिकरोडच्या चेहडी पंपिंग परिसरात हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि जया भोईर (रा. चेहडी पंपिंग) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बंद घराचे कुलूप तोडून घरातील लाकडी कपाटात लॉकरमध्ये ठेवलेले दागिने आणि रक्कम असा सुमारे साडेपाच लाखांचा ऐवज चोरांनी लांबवला.
तोतया पोलिसाचा वृद्धाला गंडा : पायी जाणाऱ्या वृद्धाला पोलिस असल्याचे सांगत सोन्याची अंगठी काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार जुना आडगाव नाका उड्डाणपुलाखाली उघडकीस आला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती व धीरजभाई गोहिल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जुना आडगाव नाका उड्डाणपुलाखालून रस्ता ओलांडत असतांना दुचाकीवर आलेल्या एकाने पोलिस असल्याचे सांगितले तर त्याच्या साथीदाराने अंगझडती घेतली. हातचलाखीने गोहिल यांचे पाकिट व बोटातील अंगठी काढून हतात देत घेत फसवणूक केली अशी तक्रार पोलिसांना दिली