कमाल तापमान 32.7 अंशांवर; ऑक्‍टोबर हिटचे चटके, 3 दिवसांत 5 अंशांनी वाढ

नाशिक (प्रतिनिधी): परतीच्‍या पावसाने सप्‍टेंबरअखेर जोरदार हजेरी लावली असताना, आता तप्त ऊन जाणवू लागले आहे. पहिल्‍याच दिवसापासून ऑक्‍टोबर हिटचे चटके बसत आहेत. मंगळवारी (ता. १) नाशिकचे कमाल तापमान ३२.७ अंश सेल्सिअस नोंदविले आहे. गेल्‍या तीन दिवसांत कमाल तापमानामध्ये पाच अंशांपर्यंत वाढ झालेली आहे. सप्‍टेंबरच्‍या शेवटच्‍या आठवड्यात परतीच्‍या पावसाने शहरासह जिल्‍हाभरात जोरदार हजेरी लावली होती.

🔎 हे वाचलं का?:  राष्ट्रीय मतदार दिवस: राज्यस्तरीय कार्यक्रमानिमित्त नाशिकला आज (दि. २५) विविध कार्यक्रम

ढगाळ वातावरण राहात असले तरी सततच्‍या रिपरिपमुळे वातावरणात गारवा निर्माण झालेला होता. परिणामी कमाल व किमान तापमानामध्ये घसरण झाली होती. परंतु आता पावसाने विश्रांती घेतली असताना, आकाशदेखील मोकळे राहाते आहे. त्‍यातच दुपारी बारा ते अडीच-तीनपर्यंत प्रखर सूर्यकिरणांमुळे उकाडा जाणवतो आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकच्या सायकलपटूंनी रॅलीतून दिला 'माझा भारत - माझं मत'चा संदेश

ऑक्‍टोबर महिन्‍याला सुरू होताच ‘ऑक्‍टोबर हिट’चे चटके सहन करावे लागत असल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. येत्‍या आठवड्यात पावसाचा अंदाज वर्तविला असला तरी पुढील काही दिवसांत उन्‍हाचे चटके अधिक तीव्र होण्याचा अंदाज वर्तविला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790