नाशिकमध्ये उष्णतेच्या झळा, ३५ अंश सेल्सिअपेक्षा अधिक तापमान !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे कडाक्याची थंडी अनुभवलेल्या नाशिककरांना आता उकाड्याला सामोरे जावे लागत आहे. शहरातील किमान व कमाल तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली असून, उष्ण वारे जाणवू लागले आहेत.

शहरात किमान तापमाना बुधवारी 18.0 अंश सेल्सिअस, तर कमाल तापमाना मंगळवारी 35.3 अंश सेल्सिअसचा इतके नोंदविले गेले. येत्या काही दिवसांत तापमान ३८ अंशांपर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

हे ही वाचा:  महत्वाची बातमी: नाशिक: शहरातील या महत्वाच्या भागांत आज वाहतुकीस 'नो एंट्री' !

उत्तरेकडील गार वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता उष्णतेच्या लाटांची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सलग आठ दिवसांपासून नाशिक शहरासह राज्यात कोरडे हवामान आहे. त्यामुळे कमाल तापमानात सरासरीपेक्षा वाढ होत आहे.

यासह किमान तापमानात चढ-उतार कायम असले, तरी कमाल तापमानाच्या वाढीमुळे उकाडा जाणवत आहे. नाशिकमध्ये सलग तीन दिवसांपासून ३५ अंश सेल्सिअपेक्षा अधिक तापमान नोंदविण्यात आले. सकाळी दहा वाजेपासूनच नाशिककरांना उष्णतेच्या झळा बसत आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: पुढील पाच दिवस राज्यातील तापमानात होणार अंशतः वाढ

दुपारी उष्ण वाऱ्यांचा प्रवाह अधिक असल्याने नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. त्यामुळे दीड ते साडेचार या वेळेत रस्त्यांवरील वर्दळदेखील घटल्याचे दिसते. दरम्यान, मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच उष्णतेचा कडाका वाढल्याने पुढील टप्प्यात नाशिककरांना तापमानवाढीच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे.

हे ही वाचा:  शेल्टर -2024 ला  उदंड प्रतिसाद; सुट्टीचे औचित्य साधून आज साईट व्हिजिटचे अनेकांचे नियोजन !

गतवर्षी पाऊसदेखील अल्प प्रमाणात झाल्याने त्याचा फटका उन्हाळ्यात बसणार आहे. मार्चअखेरीस व एप्रिल महिन्यात तापमान ३८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. परिणामी, आरोग्याच्या व्याधी उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी भरपूर पाणी प्यावे, तसेच शक्यतो उन्हात जाणे टाळावे, असा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790