नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात बुधवारी (दि. ९ सप्टेंबर) ९७२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १८०७, एकूण कोरोना रुग्ण:-३२,८९३, एकूण मृत्यू:-५५७ (आजचे मृत्यू ०९), घरी सोडलेले रुग्ण :- २६,८८६, उपचार घेत असलेले रुग्ण:- ५४५० अशी संख्या झाली आहे.
नाशिक जिल्ह्यात बुधवारी आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची यादी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा…
नाशिक शहरात बुधवारी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) श्रेयस प्लाझा, नवशक्ती चौक,भाभा नगर, नाशिक येथील ६० वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. २) देवधर संकुल, रिलायन्स पेट्रोल पंप, दिंडोरी रोड नाशिक येथील ५२ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ३) नाशिकरोड, नाशिक येथील ४० वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ४) उत्तम नगर, नाशिक येथील ५२ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ५) चेतना नगर, सिडको नाशिक येथील ५३ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ६) राजीवनगर,नाशिक येथील ४० वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ७) सातपूर, नाशिक येथील ६२ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ८) सैलानी बाबा स्टॉप, जेलरोड, नाशिकरोड येथील६७ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ९) राजश्री हौसिंग सोसायटी, आदर्श नगर नाशिक येथील ४६ वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे.