नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात बुधवारी (दि. २५ नोव्हेंबर) एका दिवसात १७० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता आत्तापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ५३९, एकूण कोरोना रुग्ण:-६५,६३४, एकूण मृत्यू:-८९९ (आजचे मृत्यू ०१), घरी सोडलेले रुग्ण :-६३,१३४, उपचार घेत असलेले रुग्ण:- १६०१ अशी संख्या झाली आहे.
नाशिक शहरात दिवाळीमध्ये वाढलेल्या गर्दीचे परिणाम आता दिसायला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत नाशिक शहरातील कोरोनाबाधीतांची संख्या कमी होत होती. मात्र दिवाळीनंतर आता हीच संख्या पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे. नागरिकांनी स्वत:ची काळजी घेण्यासाठी गर्दी कमी करणे आणि नियमित मास्क वापरणे आता गरजेचे आहे. नाशिक शहरात बुधवारी कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
मयत रुग्णांची माहिती- १) मखमलाबाद नाका, शांती नगर येथील ५० वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे.