नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात गुरुवारी (दि. २३ जुलै) दिवसभरात ३७७ कोरोनाबाधीतांची नोंद झाली आहे तर ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – २६६ एकूण कोरोना रुग्ण:-६७९३ एकूण मृत्यू:-२३०(आजचे मृत्यू ०९) घरी सोडलेले रुग्ण :- ४८८८ उपचार घेत असलेले रुग्ण:- १६७५ अशी संख्या झाली आहे.
सदर बातमी प्रसिद्ध करेपर्यंत कोरोनाबाधीतांची परिसरनिहाय यादी प्राप्त झाली नव्हती, प्राप्त होताच कमेंट बॉक्समध्ये डाउनलोडची लिंक देऊ…
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) जुने नाशिक येथील ४८ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. २) इंदिरानगर नाशिक येथील ७६ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ३) सातपूर नाशिक येथील ५६ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ४) दिंडोरी नाका, पंचवटी नाशिक येथील ७८ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ५) सातपूर, नाशिक येथील ९२ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ६) जय भवानी रोड,नाशिकरोड येथील ७२ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ७) अग्रवालवाडी, कृष्णनगर,पंचवटी, नाशिक येथील ४९ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ८)पार्थ पूजा सोसायटी,राजराजेश्वरी मंगल कार्यालयाजवळ, जेलरोड येथील ७८ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ९)इंदिरा नगर, नाशिक येथील ७६ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.