नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात शुक्रवारी (दि.१८ सप्टेंबर) ११५२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – २२१२, एकूण कोरोना रुग्ण:-४१,८८७, एकूण मृत्यू:-६३० (आजचे मृत्यू ०९), घरी सोडलेले रुग्ण :- ३५,००५, उपचार घेत असलेले रुग्ण:- ६२५२ अशी संख्या झाली आहे.
नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) गंजमाळ,नाशिक येथील ५७ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. २) सुखदेव नगर, पाथर्डी गाव येथील ४५ वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे. ३) मेहेरधाम, पेठरोड, पंचवटी, नाशिक येथील ५७ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ४) गणेश चौक,सिडको, नाशिक येथील ५५ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ५) द्वारका सर्कल जवळ, हरी मंझील,नाशिक येथील ७५ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ६) सोईस स्प्रिंग अपार्टमेंट,साई बाबा मंदिरा जवळ,डिजीपी नगर, टागोर नगर येथील ६१ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ७) अंबड, नाशिक येथील ७२ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ८) ए-२ शारजा सोसायटी, कपालेश्वर मंदिरा जवळ, पंचवटी येथील ७३ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ९) पेठरोड, नाशिक येथील ६८ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.