नाशिक शहरात सोमवारी (दि. 15 जून) दिवसभरात एकूण 65 कोरोनाबाधित ! 7 जणांचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): शहरात सोमवारी (दि. १५ जून २०२०) एकूण ६५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिकची गर्दी अशाच प्रकारे वाढत राहिली तर कठोर पावलं उचलावे लागतील असे नाशिक महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले आहे.

सोमवारी दुपारी २.४५ वाजता प्राप्त झालेल्या अहवालात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये: फकीरवाडी (कथडा)- १, जोगवाडा-१ अशा एकूण २ रुग्णांचा समावेश आहे.

हे ही वाचा:  नाशिक: मनपा शिक्षणाधिकारी सुनीता धनगर ५० हजाराची लाच घेताना ACB च्या जाळ्यात

सोमवारी दुपारी ५.२० वाजता प्राप्त झालेल्या अहवालात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये: पारिजात नगर-१, पेठ रोड-५, सरडा सर्कल-१, आडगाव नाका-१, वडाळा-१, पखाल रोड-१, रासबिहारी (आरटीओ)-१, बागवानपुरा-२, भक्ती नगर-१, कथडा-१, जुने नाशिक-४, उपनगर-१, जेलरोड-३, आझाद चौक-१, तपोवन-१, पंचवटी-१, हनुमानवाडी-३, वडाळारोड-२, वडाळा-१, शनी मंदिर (म्हसरूळ)-१ अशा एकूण ३३ रुग्णांचा समावेश आहे.

सोमवारी सायंकाळी ५.४० वाजता प्राप्त झालेल्या अहवालात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये: रामनगर (पंचवटी)-२, कोणार्कनगर-१, सावतानगर-३, बागवानपुरा-५ अशा एकूण ११ रुग्णांचा समावेश आहे.

हे ही वाचा:  नाशिक: दहावी निकालाच्या आदल्या दिवशीच इमारतीच्या गच्चीवरून ढकलून मुलीचा खून

सोमवारी सायंकाळी ७.२० वाजता प्राप्त झालेल्या अहवालात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये: द्वारका-२, लक्ष्मी निवास-१, चक्रधर सोसायटी-१, अशोका मार्ग-१, जुने नाशिक-४, कोकणीपुरा-१, बागवानपुरा-२, कपडा बाजार-१, घास बाजार-१, खुटवड नगर-१, फावडे लेन-१, वडाळा-१, पखाल रोड-१, इतर-१ अशा एकूण १९ रुग्णांचा समावेश आहे.

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790