नाशिक। दि. २७ जुलै २०२५: शहरात दहा दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती, त्यानंतर आता पुन्हा पावसाला अनुकूल वातावरण तयार झाले आहे. दोन दिवसांपासून पुन्हा रिमझिम पावसाला सुरुवात झाली असून शनिवारी सकाळपासून भूरभूर पाऊस पडत होता. दिवसभरात १२.४ मिमी पावसाची नोंद झाली. जून महिन्यात एकूण ३६४ तर जुलै महिन्यात आतापर्यंत २२१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जुलैपेक्षा जूनमध्ये अधिक पाऊस कोसळला आहे.
शुक्रवारपासून पाऊस सुरू झाला. सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळपासून हलक्या सरी कोसळत होत्या. आगामी दोन दिवस पाऊस रहाणार असल्याचा अंदाज नागपुर वेधशाळेने वर्तविला आहे. गुरुवारपासून पावसाला अनुकूल वातावरण तयार झाल्याने शुक्रवारी व शनिवारी पाऊस बरसला.
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790