नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): शहरातील नागरिकांच्या सुरक्षेकरिता पोलिस कर्मचाऱ्यांना काही वेळात पोहचण्याकरीता दलात तब्बल ११० नवीन वाहने दाखल झाले. गुरुवारी (दि. १) पालकमंत्री दादा भुसे यांनी हिरवा झेंडा दाखवत वाहनांचे औपचारिक उद्घाटन केले.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या प्रयत्नातून पोलिस महासंचालक आणि जिल्हा नियोजन व विकास समिती यांच्या निधीतून चारचाकी व दुचाकी वाहने मंजूर करण्यात आले आहे. ७ कोटी १० लाख ७ हजारांचा निधी उपलब्ध झाला होता. हे वाहने पोलिस ठाणे, गुन्हे शोधपथकासह विविध शाखांना वाटप करण्यात आले.
दामिनी पथकाला ४८ दुचाकी, नाकेबंदीसाठी 300 बॅरिकेट्स:
दामिनी पथकाला ४८ दुचाकी देण्यात आल्या आहे. महिला कर्मचाऱ्यांना वाहने मिळाल्याने आता शहरातील विविध ठिकाणी तत्काळ पोहचता येणार आहे. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलिसांकडून बॅरिक्रेट्स लावून वाहतूक, गर्दीवर नियंत्रण करण्याकरीता ३०० बॅरिकेटस उपलब्ध करण्यात आले.