नाशिक (प्रतिनिधी): ‘सुरक्षित नाशिक’ या संकल्पनेतून पोलिस आयुक्तांनी उद्योजक, सामाजिक संस्था, उद्योगपती आणि दानशूर व्यक्तींना शहराच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे देण्याचे आवाहन केले होते.
या उपक्रमांतर्गत ‘इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह कंपोनंन्टस’ (आयएसी) या कंपनीने सीएसआर फंडाच्या १० लाखांच्या निधीतून १३६ सीसीटीव्ही कॅमेरे दिले आहेत. शहरातील रस्त्यांवर हे सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत.
शहराच्या सुरक्षेसाठी या सीसीटीव्हींचे पोलिसांना सहाय्य होणार आहे. रस्त्यावर घडणाऱ्या चोरी, लूट, हाणामारी, टवाळखोरी या गुन्ह्यांना आळा बसणार आहे. पोलिस आयुक्तालयाच्या सुरक्षित नाशिक या उपक्रमात ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी 9923323311 या क्रमांकावर संदेश पाठवावा, असे आवाहन पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले आहे.
सदरचा धनादेश देण्याकरीता सदर कंपनीच्या एच आर डायरेक्टर दिपाली खैरनार, प्लांट हेड दिप्तीरंजन नायक, रिजनल मॅनेजर अनिल कुंभार, एच आर डेप्युटी मॅनेजर श्रीकांत पाटील हे सर्व कंपनीच्या वतीने स्वतः हजर होते. सदर स्तुत्य उपक्रमाकरीता मा.श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी IAC कंपनीचे नाशिक पोलीस दल व नागरीकांतर्फे अभिनंदन केले आहे.
नागरिकांनी सहभागी व्हावे:
नागरिकांनी ‘सुरक्षित नाशिक’ या उपक्रमात सहभागी होत दुकाने, कंपन्या, सोयासटी, महाविद्यालय, शाळा, धार्मिक स्थळे, खासगी क्लासेस, चौकात, महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावावेत. सुरक्षेला हातभार लावावा. – संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त