नाशिक। दि. २९ ऑक्टोबर २०२५: नाशिकरोड पोलिस ठाण्यात शिक्षण संस्थेच्या विरोधात दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपींसोबत संगनमत करत तपासी अधिकाऱ्याने जप्त केलेल्या कागदपत्रामधील रजिस्टरमधील पुरावा नष्ट करत खोटे दस्तावेज तयार केल्याप्रकरणी तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी यांना पोलिस आयुक्तांनी सोमवारी (दि. २७) निलंबित केले.
तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक गिरी यांनी पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा रजि नंबर १६४/२५, कलम ३१६, ३१८, ३४० अन्वये माहिती तंत्रज्ञान अधिनियम गुन्ह्यातील जप्त करण्यात आलेले शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडील हस्तलिखित आवक-जावक रजिस्टर तपासी अधिकारी निरीक्षक नाईकवाडे हे रजेवर असताना स्टेशन डायरीमध्ये नोंद न करता, लेखी आदेश न देता कक्षात मागवून घेतले.
गुन्ह्यातील ३ संशयितांशी संगनमत करत रजिस्टरमधील पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने जावक नोंद घेऊन खोटे दस्तावेज तयार करून गुन्हा केल्याचा गोपनीय अहवाल प्राप्त झाला. गिरी यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले.
![]()

