नाशिकमधील ‘त्या’ चार कॅफेंवर छापा; अश्लील चाळे करण्यासाठी होत्या केबिन्स

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोधक पथकाने वडाळा पाथर्डी रस्त्यावरील साईनाथनगर चौफुली ते जगन्नाथ चौकादरम्यान असलेल्या चार कैफेवर मंगळवारी (दि. १७) छापा टाकला.

या कॅफेमध्ये पडदे लावून प्रायव्हसीची सोय करण्यात आलेली होती, असे यावेळी आढळून आले काही कॅफेमध्ये अल्पवयीन मुले मुली आढळून आली, त्यांना पोलिसांनी समज देऊन काढून दिले. याप्रकरणी चारही दुकानमालकांवर इंदिरानगर पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी झालेल्या घरफोडीचा गुन्हा अखेर उघड; ६.५० लाखांचे सोन्याचे दागिने जप्त

सिन्नर पोलिसांनी तेथील काही संशयास्पद केवर केलेल्या कारवाईनंतर नाशिकच्या इंदिरानगर भागातील काही कॅफेबाबतही तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या.

यानुसार गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक सूर्यकांत सोनवणे यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन पगार यांना काही कॅफे संशयास्पद असून तेथील हालचाली व आतमधील इंटेरिअरदेखील संशयास्पद वाटत असल्याची माहिती दिली.

पगार यांच्या आदेशान्वये पथकाचे सागर परदेशी, मुश्रीफ शेख, योगेश जाधव, शामल जोशी यांनी इंदिरानगर येथील बापू बंगला परिसरातील पद्मामा बिल्डिंग शॉप नंबर चार येथे छापा टाकला.

यावेळी कॅफेमध्ये एक जिना होता, त्या जिन्याने वर गेले असता अंधारात कापडी पडदा लावून पार्टेशनद्वारे लहान कक्ष तयार करण्यात आलेले दिसले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहरातील 'या' भागांत शनिवारी (दि. ६ जून) वीजपुरवठा बंद राहणार…

त्यानंतर सराफ नगर येथील सेवन स्टार बिल्डिंग, बिल्डिंग गाळा नंबर दोन टोकियो कॅफे’मध्येही पोलिसांनी कारवाई केली असता, आतमध्ये टेबल-खुच्यावर काही अल्पवयीन मुले-मुली अश्लील चाळे करताना आढळून आली. तसेच सराफ नगर येथील दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास दश इम्पेरिया अपार्टमेंटमधील ब्लॅक स्पून कॅफेमध्ये सुद्धा पडदा लावलेल्या अंधाराच्या ठिकाणी अल्पवयीन मुले-मुली अश्लील चाळे करताना आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. या मुलामुलींना समज देऊन त्यांच्या पालकांना माहिती कळविण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 'गोल्डमॅन' लूटप्रकरणाचा उलगडा; दोन महिन्यांपासून फरार असलेला मुख्य संशयित अटकेत

याप्रकरणी संशयित कॅफेचालक अमोल लहू पिंगळे, अनिकेत सोमनाथ अहिरे, विवेक प्रवीण सोनजे, दिनेश प्रभाकर जावरे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. (इंदिरानगर पोलीस ठाणे, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ०२८८/२०२३)

कॉफी शॉपची परवानगीच नाही!:
इंदिरानगरात कारवाई करण्यात आलेल्या चारही कॉफी शॉपच्या मालकांकडे कुठल्याही प्रकारची परवानगी नसल्याचे आढळून आले. त्यांनी कॉफी शॉपचा फलक लावून व्यवसाय थाटला होता. तसेच आतील भागात अंधारामध्ये कापडी पडदे लावून पार्टेशन तयार करून मुला- मुलींना बसण्याची व्यवस्था करून दिलेली होती. यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790