नाशिक: भरधाव मालवाहू पिकअपने रस्त्यावर फुलविक्री करणा-या विक्रेत्यांना चिरडले

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): पाथर्डी फाटा येथील मॅकडॉनल्ड परिसरातील सर्व्हीसरोडवर भरधाव मालवाहू पिकअपने रस्त्यावर फुलविक्री करणा-या विक्रेत्यांना चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली.

यात ६० वर्षीय वृध्देचा जागीच मृत्यू झाला तर दोन महिलांसह एक जण जखमी झाला आहे. मंदाबाई गंगाधर आष्टीकर (६०, रा.माऊडन ह्यू अपा. पाथर्डी फाटा) असे मृत वृध्देचे नाव आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहरातील सहायक पोलीस आयुक्तांची खांदेपालट

तर बबीता भगवान बदरगे,रतनबाई पोपट वाघचौरे व भिकन रामदास पाखले हे फुलविक्रेते या अपघातात जखमी झाले आहेत. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिकअपचालकास चोप देत नागरीकांनी पोलिसांच्या स्वाधिन केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महिला व जखमी पाथर्डी फाट्यावरील उड्डाणपूल भागात रस्त्यालगत साईडपट्टीच्याखाली नेहमीप्रमाणे फुलांचे गाठोडे घेऊन फुले विक्री करत असतांना हा अपघात झाला. वासन शोरूमकडून भरधाव येणा-या पिकअपने रस्त्याच्या कडेला फुलविक्री करणा-या विक्रेत्यांना चिरडले. वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला.

⚡ हे ही वाचा:  नाशिककरांनो लक्ष द्या ! शहरातील 'या' वाहतूक मार्गांत अतिशय महत्वाचे बदल !

यात मंदाबाई आष्टीकर यांचा जागीच मृत्यू झाला तर उर्वरीत विक्रेते गंभीर जखमी झाले असून अपघातानंतर धाव घेत स्थानिकांनी त्यांना रूग्णालयात दाखल केले आहे. यावेळी जमलेल्या जमावाने चालकास चोप देत पोलिसांच्या स्वाधिन केले असून याप्रकरणी हवालदास सुधाकर गोसावी यांनी दिलेल्या खबरीवरून चालक किरण राजेंद्र गोसावी (२२ रा.कोकणीपाडा जि.नंदूरबार) याच्याविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार गारले करीत आहेत.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here