Live Updates: Operation Sindoor

नाशिक: महानगरपालिकेने अनाधिकृत भंगारची दुकाने काढली; तीन ट्रक साहित्य जमा !

नाशिक (प्रतिनिधी): वडाळा घरकुल येथे अनाधिकृत भंगारची दुकाने तसेच इतर अवैध अतिक्रमण मंगळवारी काढण्यात आले. तसेच राजीव नगर झोपडपट्टी येथील अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्याच्या सूचना देण्यात आल्या.

👉 हे ही वाचा:  महावितरणच्या नाशिक मंडळ अधिक्षक अभियंतापदी राजेश थूल रुजू

त्याचबरोबर त्रिमूर्ती चौक येथील ओपन स्पेस मधील अनधिकृत पक्के दुकान तोडण्यात आले. इतर व्यवसायिकांना त्यांच्या शेड तोडण्याच्या सूचना देण्यात आल्या. पवन नगर भाजी मार्केट येथील अतिक्रमण काढण्याच्या सूचना देण्यात आल्या यावेळी विभागीय अधिकारी राजाराम जाधव, श्रीमती बैरागी मॅडम तसेच नवीन नाशिक नाशिक पूर्व व इतर विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या कारवाईत एकूण तीन ट्रक साहित्य जमा करण्यात आले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790