नाशिक (प्रतिनिधी): आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांसाठी संघटनात्मक बांधणीकडे लक्ष देण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे गुरुवारपासून (दि. २३) नाशिकच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्यासोबत युवा नेते अमित ठाकरेही येत आहेत.
गुरुवारी सकाळी १० वाजता ते पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील. गुरुवारी आणि शुक्रवारी दोन्ही दिवस ते शहर व जिल्ह्याच्या मनसे पदाधिकाऱ्यांशी, कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असून विभागनिहाय बैठका घेणार आहेत. शनिवारी ते (दि. २५) मुंबईला परतणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
मनसेतून मोठ्या संख्येने शिंदे सेना व भाजपत आउटगोइंग झाले आहे. तसेच लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मनसेला अपेक्षित यश न मिळाल्याने राज ठाकरे संघटना बांधणीवर लक्ष देणार असल्याचे सांगण्यात आले.
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790