नाशिक (प्रतिनिधी): एकलहरारोड, अरिंगळे मळा येथील किराणा-जनरल स्टोअर्सवर पोलिसांनी छापा मारून सहा लाख रुपये किमतीचा प्रतिबंध असलेला गुटखा व तंबाखू जप्त केली. सतीश एकनाथ सांगळे याच्या महाकाल किराणा दुकानात राज्यात बंदी असलेला गुटखा व सुगंधित तंबाखू विक्री केली जात असल्याची व त्या मालाची साठवणूक केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री या दुकानावर छापा मारून विमल गुटख्याच्या तीन गोण्या, विमल पानमसाल्याच्या १८ गोण्या, राजनिवास गुटख्याच्या सहा गोण्या, वाह गुटख्याच्या तीन गोण्या, सुगंधी मिराज तंबाखू असलेले खोके असे विविध प्रकारचे राज्यात बाळगण्यास व विक्री करण्यास बंदी असलेला गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा सापडला. पोलिसांनी हा पावणे सहा लाखांचा माल जप्त केला असून, नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: ३९१/२०२४)