जुन्या नाशकात सिलिंडर स्फोटात घर खाक; आग विझवताना अग्निशमनचे ३ जवान जखमी

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): जुने नाशिक परिसरातील चव्हाटा भागात गुरुवारी (दि. १२) सायंकाळी ६ वाजता एका घराला भीषण आग लागली. गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचे समजते. आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले होते. ही बाब नागरिकांनी अग्निशमन दलाला कळविताच घटनास्थळी अग्निशमन बंब दाखल झाला. आग नियंत्रणात आणताना अग्निशमनचे तीन कर्मचारी भाजले.

हे ही वाचा:  नाशिक: थंडीचा कडाका वाढला; पारा १२.४ अंशांपर्यंत घसरला

चव्हाटा भागात मारुती मंदिराच्या बाजूला शुभम कृष्णकांत धाडा यांच्या मालकीच्या घरात रूपाली गायकवाड या भाडेकरी राहतात. त्यांच्या घरात गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आग लागली. काही वेळानंतर गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे आग भडकली. अग्निशामक दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले.

हे ही वाचा:  बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी तर दहावीची २१ फेब्रुवारीपासून

अग्निशमन दलाने तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवत आग विझवली मात्र यात इसाक शेख, आकाश गिते व प्रथमेश वाघ हे तीन अग्निशमन जवान जखमी झाले. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790