नाशिक: नंदिनी नदी किनारी गॅबियन वॉलचे काम अखेर सुरू

शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनच्या प्रयत्नांना यश

नाशिक (प्रतिनिधी): उंटवाडीतील दोंदे पुलाजवळ नंदिनी नदी किनारी अखेर गॅबियन वॉलच्या कामाला सुरुवात झाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनच्या सततच्या दोन वर्षांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. प्रभाग २४ मधील नागरिकांनी महापालिका व शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनचे आभार मानले आहे.

नंदिनी नदीवर गॅबियन वॉल बांधण्यासाठी आर्थिक तरतूद करावी, यासाठी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या पुढाकाराने १३ डिसेंबर २०२१ रोजी निवेदन देण्यात आले. तत्कालीन महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी ८ फेब्रुवारी २०२२ च्या अर्थसंकल्पात गॅबियन वॉलसाठी १ कोटी ६४ लाख ९० हजार रुपयांची तरतूद केली.

हे ही वाचा:  नाशिक: महिरवणीला दोन गटांत झालेल्या हाणामारीत युवकाचा मृत्यू

बदललेली दर सूची व जीएसटीसह २०२३-२४च्या अर्थसंकल्पात यासाठी वाढीव रक्कमेसह १ कोटी ९७ लाखांची तरतूद धरण्यात आली आहे. या कामाची निविदा २५ एप्रिलला जाहीर झाली. राजकीय दबावामुळे प्रशासन निविदा उघडत नव्हते. शेवटी नंदिनी नदीत आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर ही निविदा उघडण्यात आली. यानंतर वर्कऑर्डर काढून काम सुरू होईपर्यंत सतत पाठपुरावा करण्यात आला.

हे ही वाचा:  नाशिक: देवयानी फरांदे यांना वाढता पाठिंबा; विविध संस्था, संघटनांचे पाठबळ

अखेर दोन दिवसांपूर्वी गॅबियन वॉलच्या कामाला सुरुवात झाली आहे. सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, भारती देशमुख, संगीता नाफडे, बाळासाहेब तिडके, फकिरराव तिडके, प्रभाकर खैरनार, विनोद पोळ, रवींद्र सोनजे, मनोज वाणी, सतिश मणिआर, नीलेश ठाकूर, यशवंत जाधव, आनंदा तिडके, डॉ. शशीकांत मोरे, बाळासाहेब राऊतराय, अनंत संगमनेरकर, सतीश कुलकर्णी, अशोक पाटील, संध्या छाया ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव देवरे, बाळासाहेब देशमुख, बापूराव पाटील, दिलीप दिवाणे, बन्सीलाल पाटील, मनोज पाटील आदींसह रहिवाशांनी महापालिकेचे आभार मानले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790