नाशिक: नायलॉन मांजाने मांडीची नस कापली; अति रक्तस्त्राव झाल्याने नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नायलॉन मांजा आधी पायात अडकला. त्यानंतर मांडीची नस कापल्याने गंभीर जखमी झालेल्या ९ वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवारी (दि. ८) सकाळी ११.३० वाजता वडाळागाव येथे ही घटना घडली. गंभीर जखमी अवस्थेत मुलाला डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती खालावल्याने त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. इंदिरानगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आज भारतीय सेनेच्या आधुनिक शस्त्रसामग्रीसह आपत्ती प्रतिसाद दल उपकरणांचे प्रदर्शन

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विष्णू संगम जोशी (९, रा. माळी गल्ली, मारुती मंदिराजवळ, वडाळा गाव) येथे सकाळी ११ वाजेच्या सुमारास परिसरातील मुलांसोबत खेळत असताना या ठिकाणी काही इसम नायलॉन मांजाने पतंग उडवत होते. त्याचवेळी मांजा मुलाच्या पायात अडकला, मांजा अडकल्याने पतंग उडवणाऱ्या इसमाने तो खेचण्याचा प्रयत्न केला असता मांजा मुलाच्या उजव्या पायात अडकून त्याच्या मांडीची नस कापून रक्तस्त्राव होऊ लागला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ.गेडाम यांच्या हस्ते ध्वजारोहण

अति रक्तस्त्राव झाल्याने नागरिकांनी त्याला झाकीर हुसेन रुग्णालयात दाखल केले. येथे उपचार सुरू असताना त्याची प्रकृती अधिकच खालावत गेल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. इंदिरानगर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तो मनपा शाळेत इयत्ता तिसरीमध्ये शिक्षण घेत होता. मांजा विक्रेते आणि वापरकर्त्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शेअर ट्रेडिंगच्या आमिषातून ज्येष्ठ नागरिकाची ९९.५० लाखांची फसवणूक

मांजा विक्रेता अन् वापरकर्त्यांवर कारवाई होणार:
संक्रातीला दोन महिन्यांचा कालावधी असताना शहरात नायलॉन मांजाची विक्री सुरू झाली आहे. नायलॉन मांजा वापर करणे विक्री करणे हा गंभीर गुन्हा आहे. तरीही मांजाची शहरात विक्री होत असेल तर आणि या घटनेतील पतंग विक्रेत्यांनी मांजा कुठून आणला त्या विक्रेत्याला शोधून तसेच पतंग उडविणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790