नाशिक (प्रतिनिधी): नाशिकरोड येथील शिखरेवाडी परिसरातील श्री बालाजी मंदिरात १० जानेवारी रोजी वैकुंठ एकादशीनिमित्त विष्णु सहस्त्रनामसह विविध धार्मिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती कैलास मुदलियार यांनी दिली.
शुक्रवारी सकाळी ६ ते ८ श्री बालाजी भगवान महाअभिषेक, सकाळी ९ ते १० उत्सवमूर्ती अभिषेक, सकाळी १०.३० ते १२ पर्यंत रवींद्र देवनहळली यांचे विष्णुसहस्त्रनाम पठण, सायंकाळी ५ ते ६ मंगला दाते यांची भजनसंध्या, सायंकाळी ६ ते ७ श्री सुक्त पठण, सायंकाळी ७.४५ वा. महाआरती तर रात्री ८ वा. भिमदास प्रभु यांचे हरिनाम संकिर्तनाचा कार्यक्रम, त्यानंतर महाप्रसाद वाटप होणार असल्याचे विनायक उपाध्ये, मिलिंद भट यांनी सांगितले.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790