नाशिक: अशोक खरातला आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी

नाशिक। दि. २४ मार्च २०२६: महिलांच्या लैंगिक शोषणाच्या गंभीर आरोपांखाली अटकेत असलेल्या भोंदू कॅप्टन अशोक खरात याला नाशिक सत्र न्यायालयाने आणखी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता त्याची कोठडी दि. २९ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहरातील 'या' वाहतूक मार्गांत आज (दि. २६) महत्वाचे बदल

नाशिक गुन्हे शाखेने खरातला दि. १७ मार्च रोजी अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याला दि. २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली होती. आज कोठडीची मुदत संपत असल्याने मंगळवारी दुपारी सुमारे ३.५० वाजता त्याला सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.

यावेळी सरकारी पक्ष आणि बचाव पक्ष यांच्यात सविस्तर युक्तिवाद झाला. सरकारी वकिलांनी तपासासाठी आणखी वेळ आवश्यक असल्याचे सांगत सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. तपासादरम्यान आरोपी लोकांना पेढे देणे, पाणी पाजणे आणि त्यानंतर मळमळ होण्याच्या घटनांची पडताळणी करायची असल्याचे त्यांनी नमूद केले. संबंधित साहित्य कुठून आणले जात होते, याचा शोध घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी न्यायालयासमोर मांडले.

🔎 हे वाचलं का?:  रेल्वे तिकीटांच्या नियमांत महत्वाचे बदल; एप्रिलपासून होणार लागू… जाणून घ्या सविस्तर…

तसेच आरोपीच्या फार्महाऊसमध्ये पिस्तुलच्या पाच रिकाम्या पुंगळ्या आढळून आल्याने त्या नेमक्या कुठे आणि कशा वापरण्यात आल्या याचा तपास करणे बाकी असल्याचेही सरकारी पक्षाने स्पष्ट केले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790