नाशिक। दि. २४ मार्च २०२६: कुंभमेळ्याकरिता तपोवनातील अठराशे झाडे तोडण्याचा प्रस्ताव महापालिकेने ठेवला असता यावर शहरातील वृक्षप्रेमींसह नाशिककरांनी तीव्र विरोध केला. या वृक्षतोड प्रकरणाची सुनावणी आता १ एप्रिल रोजी होणार आहे.
तपोवन वृक्षतोडीच्या विरोधात वृक्षप्रेमींचे आंदोलन सुरू आहे. याप्रकरणी मनसेचे उपशहराध्यक्ष अॅड. नितीन पंडित यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या अगोदर मनपाने न्यायालयात हरित लवाद येथे सुरू असलेले प्रकरण प्रथम चालविण्यात यावे, त्यानंतर महापालिका व वृक्ष प्राधिकरण विभाग आपले प्रतिज्ञापत्र सादर करेल अशी भूमीका घेतली होती, परंतु न्यायालयाने पालिकेचे म्हणणे फेटाळले होते.
![]()
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790

