नाशिक। दि. २० डिसेंबर २०२५: नाशिक शहरात डिसेंबर व जानेवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात पतंग उडविले जातात. पंतग उडविण्यासाठी वापरात येणारा मांजा (दोरा) हा नायलॉन असल्याचे निदर्शनास आले असून यामुळे वन्य प्राणी, पक्षी व मानवी जीवीतास धोका निर्माण होवून त्यांचे जखमी होण्याचे व प्राण गमाविण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
नायलॉन मांजामुळे विजेच्या तारांचे परस्पर घर्षण होवून विद्युत प्रवाह खंडीत होणे, आग लागणे अशा घटनाही घडतात. यास प्रतिबंध म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 37 (1) (अ) अन्वये पोलीस आयुक्त नाशिक संदीप कर्णिक यांनी ज्या मांजांना काचेची कोटींग आहे, अशा टोकदार व धारदार चायनीज मांजा यांची निर्मिती, विक्री, साठा व वापर यावर प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी केला आहे.
कोणी व्यक्ती शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दांडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशा पद्धतीचा नायलॉन मांजा बाळगेल, वापर करेल अशा व्यक्तीवर देखील सदरचा आदेश लागू राहील.
हा आदेश 20 डिसेंबर, 2025 रोजी मध्यरात्रीपासून ते 3 जानेवारी, 2026 पावेतो अंमलात असेल. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय न्यास संहिता 2023 या कायद्याचे कलम 223 प्रमाणे शिक्षेस पात्र असेल, असेही आदेशात नमूद केले आहे.
![]()

