🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

नाशिक, दि. १८ फेब्रुवारी २०२६: छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आज 18 व उद्या 19 फेब्रुवारी, 2026 रोजी जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे शहरातील महाकवी कालिदास कलामंदिर येथे आयोजन करण्यात आले आहे.

दोन्ही कार्यक्रम शासन पुरस्कृत असून सर्वासाठी खुले व विनामुल्य आहे. नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे गुणवत्ता राखून वेळेत पूर्ण करा- आयुक्त शेखर सिंह

असे आहे कार्यक्रमाचे स्वरूप:
बुधवार, १८ फेब्रुवारी, २०२६ रोजी दुपारी १२.३० ते २.३० या वेळेत छत्रपती संभाजी नगर येथील शाहीर प्रवीण जाधव यांचा शाहीरी व पोवाड्याचा कार्यक्रम महाकवी कालिदास कलामंदिर, नाशिक येथे सादर होईल.

गुरूवार, १९ फेब्रुवारी, २०२६ रोजी दुपारी १२.३० ते २.३० या वेळेत याच ठिकाणी वसंतराव कानेटकर लिखित “रायगडाला जेव्हा जाग येते” या ऐतिहासिक शिवकालीन नाटकाचा प्रयोग सादर करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790