नाशिक: कर्मयोगीनगर येथील जलकुंभावर अखेर ‘फायर हायड्रंट’ची सुविधा

नाशिक। दि. ८ एप्रिल २०२६: कर्मयोगीनगर येथील जलकुंभावर अखेर महापालिकेने ‘फायर हायड्रंट’ची सुविधा केली आहे. यामुळे आता टंचाईच्या काळात या ठिकाणाहून परिसराला लवकर टँकरने पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनच्या सतत सहा महिन्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

नाशिकच्या प्रभाग क्रमांक २४ मधील कर्मयोगीनगर येथील जलकुंभातून पाणी पुरवठा सुरू करण्यात यावा, यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख) यांनी नागरिकांसह या जलकुंभावर चढून व अधिकार्‍यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' वाहतूक मार्गांत आज (दि. ११) महत्वाचे बदल

एक वर्षाच्या प्रयत्नांनंतर १३ नोव्हेंबर २०२५ ला येथून पाणी पुरवठा सुरू झाला. येथे ‘फायर हायड्रंट’ची सुविधा करावी, अशी मागणी ३ नोव्हेंबर २०२५ पासून वेळोवेळी करण्यात आली, आंदोलनाचा इशारा देण्यात आला. महापालिकेने हे काम रविवारी, ५ एप्रिल रोजी पूर्ण केले.

एक वर्षापासून प्रभागात वारंवार पाणी टंचाई निर्माण होत आहे. मोरवाडी आणि पाथर्डी फाटा येथून महापालिकेचे पाण्याचे टँकर भरून येतात. अंतर जास्त असल्याने फेर्‍या कमी होतात, परिणामी परिसराला हेही पाणी पुरेसे मिळत नाही. आता कर्मयोगीनगर येथील जलकुंभावरच ही सुविधा झाली आहे. गोविंदनगर, कर्मयोगीनगर, जगतापनगर, उंटवाडी, प्रियंका पार्क, तिडकेनगर, गोविंदनगर, बाजीरावनगर, कालिका पार्क, पाटीलनगर, सिडको भागात कमी वेळेत महापालिकेचा टँकर येणे शक्य होणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील महिला अत्याचार प्रकरणी महत्वाची अपडेट...

आगीसारखी दुर्घटना घडल्यास या भागात या जलकुंभावरून पाणी उपलब्ध होणार आहे. सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, संजय टकले, विनोद पोळ, दिलीप रौंदळ, दिलीप दिवाने, सतीश कुलकर्णी, सतीश मणिआर, बाळासाहेब राऊतराय, डॉ. शशीकांत मोरे, मनोज वाणी, मीना टकले, वंदना पाटील, निलेश ठाकूर, डॉ. राजाराम चोपडे, अशोक पाटील, अनंत संगमनेरकर, शैलेश महाजन, दीपक दुट्टे, राहुल काळे, सचिन राणे, पंढरीनाथ पाटील, पुरुषोत्तम शिरोडे, हरिष काळे आदींनी महापालिका पाणी पुरवठा विभागाचे आभार मानले आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790