LPG

नाशिकरोडला ६१ हजारांचा नायलॉन मांजा जप्त

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकरोड पोलिसांनी एकलहरारोडवरून ६१ हजार रुपये किमतीचे नायलॉन मांजाचे ९७ गट्टू जप्त केले. पोलिस शिपाई समाधान वाजे आणि अजय देशमुख हे दोघे गस्तीवर असताना त्यांना देवेंद्र गोविंद शिरसाठ हा इसम नायलॉन मांजा विक्री करतो अशी गोपनीय माहिती मिळाली.

🔎 हे वाचलं का?:  देवळाली रिंग रोडसाठी भूसंपादन; शेतकऱ्यांना योग्य मोबदल्याबाबत शासनाचा सहानुभूतीपूर्वक विचार- मंत्री शिवेंद्रसिंह भोसले

नाशिक बाजार समितीच्या सिन्नर फाटा मार्केटजवळ शिरसाठ हा प्लॅस्टिकच्या एका गोणीत मांजा घेऊन निघाला होता. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने वाजे आणि देशमुख यांनी त्याची चौकशी केली असता त्याच्या गोणीत ६१ हजार रुपये किमतीचे नायलॉन मांजाचे ९७ गहू आढळले. मांजा जप्त करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790