कोविड रुग्णालये सुरूच राहणार.. बंदचा निर्णय मागे..

नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसेवा करता करता आम्ही थकलो आहे तसेच रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे सरकारी रुग्णालयात देखील उपचार करण्याची सुविधा असल्याचे कारण देत कोविड रुग्णसेवा बंद करण्याचा एकतर्फी निर्णय अखेर हॉस्पिटल ओनर असोसिएशनने मागे घेतला आहे.

याप्रकरणी कारवाई येण्याचा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे व महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिल्यानंतर अवघ्या २४ तासांतच हा निर्णय मागे घेतला गेला. तत्पूर्वी स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी असोसिएशनच्या शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेत सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कोविड रुग्णसेवा अखंडितपणे सुरू ठेवण्याची ग्वाही पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार

दरम्यान, डॉक्टरांना सोसाव्या लागत असलेल्या मानसिक व सामाजिक दबावामुळे रुग्णसेवा बंद करण्याची परवानगी केवळ मागितली होती. आता आयुक्तांनी असोसिएशनच्या मागण्या, समस्या सामंजस्याने सोडविण्याचे आश्वासन दिले असल्यामुळे कोविड रुग्णसेवा अखंडीतपणे सुरू राहील असे असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रमाकांत पाटील, उपाध्यक्ष डॉ. राज नगरकर यांनी स्पष्ट केले.

शहरात कोरोना रुग्णांकडून लूट होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. ही कथित लू’ट रोखण्यासाठी संबंधित रुग्णालयांच्या बिलांची तपासणी करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला. मात्र त्यानंतरही जादा बिल आकारण्याच्या तक्रारी कायम असल्यामुळे पालिकेने क’डक कारवाईचा इशारा दिला होता. तसेच सामाजिक संघटना कार्यकर्त्यांनी आं’दोलन सुरू केल्याचे बघून हॉस्पिटल ओनर असोसिएशनने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह राज्याचे आरोग्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांना पत्र पाठवत कोरोना रुग्णसेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे कळविले होते.

हे ही वाचा:  नाशिक: बेकायदा होर्डिंग्ज हटविण्यासाठी मनपाकडून १५ दिवसांची मुदत

हॉस्पिटलच्या या पवित्र्यामुळे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधत साथरोग प्रतिबंधक कायदा लागू असताना असा असं’वैधानिक निर्णय घेवू नये. अन्यथा कारवाई करावी लागेल, असा इशारा दिला. तर पालिका आयुक्त जाधव कैलास जाधव यांनी असोसिएशनच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून समजूत काढली. यावेळी डॉक्टरांनी कोरोना रुग्णसेवा करताना येणाऱ्या अडचणी, सोसावा लागणारा मानसिक व सामाजिक दबाव, सोशल मिडियाद्वारे होणारी डॉक्टारांची बदनामी आणि ऑक्सीजन, रेमडेसिवीरसाठी येणारा प्रशासकीय दबाव यामुळे कोरोना रुग्णसेवा बंद करण्याची विनंती केवळ मुख्यमंत्र्यांना केली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790