नाशिक शहरातील किराणा व धान्य दुकानं या वेळेतच सुरु राहणार..

नाशिक शहरातील वाढती रुग्णसंख्या बघता हा निर्णय संघटनेने घेतला आहे..

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शहरातील घाऊक आणि किरकोळ धान्य व किराणा दुकानदारांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. घाऊक दुकाने सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत तर किरकोळ व्यापारी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंतच दुकाने सुरु ठेवणार असल्याचा निर्णय शहरातील विविध व्यापारी संघटनांच्या ऑनलाईन बैठकीत घेण्यात आल्याची माहिती नाशिक धान्य किरण घाऊक व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती यांनी दिली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: रामकुंडावरील वस्त्रांतरगृह महापालिका घेणार ताब्यात; बंदोबस्ताची मागणी

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790