नाशिकच्या ‘या’ सहा सराफांकडून सेवानिवृत्त अधिकाऱ्याची एक कोटी १७ लाखांची फसवणूक

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): सोने तारण ठेवत जादा परतावा व रक्कम देण्याचे आमिष दाखवत एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याला एक कोटी १७ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नाशिकच्या सहा नामांकित सराफ व्यावसायिकांच्या विरोधात अंबड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेने एका सराफासह त्याच्या व्यवस्थापकाला अटक केली आहे.

प्रथमदर्शनी या गुन्ह्याची व्याप्ती वाढणार असून यात आणखी तक्रारदार वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. अश्विननगर भागातील रहिवासी व सेवानिवृत्त अधिकारी गिरीश पोतदार यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, २०१६ ते २०२३ या कालावधीत कुटुंबियांचे सोन्याचे दागिने त्यांनी सराफ व्यावसायिक संशयित शाम आडगावकर यांच्याकडे तारण ठेवले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: गंभीर गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या संशयिताला बेड्या !

त्यांच्यासोबत इतर ५ ते ६ सराफी व्यावसायिकांनी हे सोने तारण ठेवल्यास तुम्हाला मुदतीत दुप्पटीने पैसे देण्याचे आमिष दाखविले. ९ वर्षापासून तक्ररादराने वारंवार संशयितांकडे सोन्याची रक्कम, व्याज आणि तारण ठेवलेले सोने परत देण्याची मागणी केली. मात्र संशयित टाळाटाळ करत होते.

तक्रारदाराने तगादा लावल्यानंतर संशयितांनी जे दागिने परत केले, ते देखील त्यांचे न देता दुसरेच दागिने निघाल्याचे व कमी वजनाचे दिल्याचे लक्षात आले. याचा जाब विचारण्यासाठी संशयितांकडे गेले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोतदार यांनी पोलिसांत धाव घेतली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: भरधाव मोटारसायकलच्या धडकेत २४ वर्षीय युवतीचा मृत्यू

पोलिसांनी शाम आडगावकर, महेश आडगावकर, सागर आडगावकर, दुकानाचे मॅनेजर शंकर गोडसे (आडगावकर सराफ प्रा. लि. कॅनडा कॉर्नर नाशिक) तसेच मयूर शहाणे, राजेंद्र शहाणे (मयूर ज्वेलर्स, गंगापूर रोड, नाशिक) यांच्या विरोधात १ कोटी १७ लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला. (अंबड पोलीस ठाणे: गुन्हा रजिस्टर क्रमांक: ११९/२०२४) दरम्यान, या गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू असतांना संशयित शाम आडगावकर व व्यवस्थापक शंकर गोडसे यांना अटक केली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 30 सप्टेंबरपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी !

अपहाराची व्याप्ती वाढणार:
संशयित सराफ व्यावसायिकांनी सोने तारण ठेवत दामदुप्पट रक्कम व सोने परत करण्याचे आमिष देत नागरिकांकडून लाखो रुपयांचे सोने तारण ठेवत फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या अपहाराची व्याप्ती वाढण्याची शक्यता असून सुमारे १० ते १५ कोटींचा अपहार झाल्याची शक्यता आहे. या प्रकारात आणखी कोणाची फसवणूक झाल्यास आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार करावी. या गुन्ह्यात दोघांना अटक करण्यात आली आहे. – प्रशांत बच्छाव, उपायुक्त, गुन्हे शाखा

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here