नाशिक (प्रतिनिधी): डिझने+हॉट स्टार या अॅपचे सबस्क्रिप्शन अपग्रेड करण्याच्या नावाखाली अज्ञात इसमाने ६० वर्षीय वृद्धेला सुमारे साडेदहा लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत जेलरोड येथे राहणाऱ्या चॅटर्जी नामक ६० वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. चॅटर्जी यांच्याशी अज्ञात मोबाईलधारकाने संपर्क साधला. फिर्यादीस डिझने + हॉट स्टार या अॅपचे सबस्क्रिप्शन अपग्रेड करण्याच्या नावाखाली गुगलद्वारे प्राप्त झालेल्या मोबाईलवर संपर्क करण्यास सांगितले. त्यानुसार या महिलेने त्यांच्याशी ऑनलाईन संपर्क साधला.
त्यावेळी आरोपीने एनी डेस्क रिमोट डिझनेपद्वारे फिर्यादीच्या मोबाईलचा डिझनेक्सेस व कस्टमर आयडी घेतला. नेट बँकिंगद्वारे एचडीएफसी बँकेच्या खात्यातून तीन व्यवहार आयएमपीसी व एनईएफटीद्वारे एकूण १० लाख ५० हजार रुपये डेबिट करून आर्थिक फसवणूक केली.
हा प्रकार दि. ४ ते ५ जानेवारी २०२४ दरम्यान घडला. ही बाब फिर्यादी चटर्जी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी फसवणुकीकरिता वापरण्यात आलेल्या मोबाईलधारकासह फसवणुकीची रक्कम वर्ग झालेल्या बँक व वॉलेट खातेधारकाविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख करीत आहेत.
![]()


