नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): पार्टटाईम जॉबचे अमिष देत शहरातील ११ बेरोजगार युवकांना ६५ लाख ६२ हजारांचा ऑनलाइन गंडा घातल्याप्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि पंकज धामणे (रा. नाशिक) यांच्या तक्रारीनुसार, मोबाइलवर आलेल्या लिंकला प्रतिसाद देत संशयित हॅकरने संपर्क साधून पार्टटाइम जॉबसाठी ऑफर असल्याचे सांगीतले. धामणे यांनी जॉबकरिता होकार दर्शवला.
संशयिताने दिलेला टास्क धामणे याने पूर्ण केल्यानंतर धामणे यांच्या बँक खात्यात १५० रुपये जमा झाले. संशयितांनी दोन वेळा पैसे बँकेत जमा केल्यानंतर पेड टास्क दिले. धामणे यांनी १० हजारांची रक्कम बँक खात्यात जमा केली अशाचप्रकारे इतर ११ तरुणांनी देखील वेळोवेळी ६५ लाख ६२ हजारांची रक्कम ऑनलाइन जमा केली. टाक्स पूर्ण केल्यानंतर बँक खात्यात रक्कम जमा झाली नाही म्हणून संपर्क साधला असता संशयितांनी जमा झालेले पैसे काढण्याकरिता आणखी पैसे भरण्यास सांगितले.