नाशिक (प्रतिनिधी): मनी लाँडरिंग केसमध्ये सहभागी असल्याचे सांगून मुंबई पोलिसांच्या टीआरएआय विभागातून बोलत असल्याचे भासवत चार्टर्ड अकाउंटंटला घरात कैद केले. व्हिडिओ कॉल करत ऑनलाइन पैसे भरण्यास भाग पाडून १३.५० लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला.
याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीए व्यावसायिक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, घरी असताना अनोळखी नंबरहून व्हिडिओ कॉल आला. समोरील व्यक्तीने चॅटिंग करत मुंबई पोलिसांच्या टीआरएआय विभागातून बोलत असल्याचे सांगून तुम्ही नरेश गोयल मनी लाँडरिंग केसमध्ये सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
तुमच्या नावाचे वॉरंट निघाले असून तुम्हाला पकडण्यास पथक तुमच्या घराजवळ आले आहे. कारवाई टाळण्याकरता बँक खात्यातील रक्कम शासनाच्या बँक खात्यात जमा करण्यास सांगितले. अटकेच्या भीतीने सीए यांनी १३ लाख ५० हजारांची रक्कम संशयितांनी सांगितलेल्या बँक खात्यात वर्ग केली. घरच्यांनी विचारल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
![]()


